HW News Marathi
महाराष्ट्र

क्रांती रेडकरांनी नवाब मलिकांविरोधात दाखल केला FIR

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होणाऱ्या खुलाशांमुळे NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे हे सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता समीर यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एक पाऊल उचललं आहे. क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल केल्याचं सांगितलं आहे. समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लीम यावरुन राजकारण पेटलेलं असताना स्पष्टीकरण देताना क्रांती रेडकर म्हणतात की, “निकाह झाला पण समीरने कायदेशीररित्या धर्म, जात बदलली नाही. माझी सासू मुस्लिम असल्याने त्यांच्या आनंदासाठी हा निकाह झाला होता. ती केवळ औपचारिकता होती.”

नवाब मलिक यांच्याविरोधात आपण FIR दाखल केल्याची माहिती देताना क्रांती रेडकर म्हणाल्या की, “आमचे वैयक्तिक फोटो शेअर करून नवाब मलिक हे त्यांनी घेतलेल्या संवैधानिक शपथेविरुद्ध काम करत आहेत. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. समीर वानखेडे यांना पदावरून हटवणं हा त्यांचा एकच हेतू आहे. त्यांना स्वतःच्या जावयाला वाचवायचे आहे.” असे अनेक आरोप करत क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपा सरकारविरोधात मत व्यक्त केले तर कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का ? – अतुल लोंढे

Aprna

रस्त्यांची डागडुजी, नालेसफाई, आपत्ती व्यवस्थानातील सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावेत! – एकनाथ शिंदे

Aprna

बचत गटांना संधी देण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर विक्री मॉल उभारणार; सुनील केदार यांची घोषणा

News Desk