HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंचे बनावट ट्विटर अकाऊंट, खडसेंनी या विरोधात दाखल केली तक्रार

जळगाव | समर्थक आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी राजकीय नेते सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात. मात्र काहीवेळा हेच समर्थक तर कधी संबंधित नेत्याला नेत्याला ट्रोल करण्यासाठी विरोधक या नेत्यांच्या नावाने बनावट अकाऊंट सुरू करतात. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या बाबतही अशाच काहीसा प्रकार घडला आहे.

एकनाथ खडसे यांच्या नावाने एक ट्विटर अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. याबाबत खडसे यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून माहिती देत कारवाईचा इशारा दिला असून @EknathGKhadse हे अधिकृत अकाउंट असल्याचे सांगितलं आहे.

‘कुणीतरी खोडसाळपणे माझ्या नावाने @KhadseSpeaks हे ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे, जे अनधिकृत आहे. याच्या संदर्भात रीतसर ट्विटरकडे तक्रार दाखल केली आहे. माझे अधिकृत अकाऊंट @EknathGKhadse हे असून त्याला 2 लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.’ असे ट्विट एकनाथ खडसे यांनी अधिकृत अकाऊंट वरून केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

News Desk

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम निर्णय जाहीर करू !

News Desk

#Coronavirus : धक्कादायक ! पुण्यात ४ तासांत ४ जणांचा मृत्यू

News Desk