मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समीत ठक्करला २४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्याला आज (३ नोव्हेंबर) कोर्टापुढे पुन्हा हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Maharashtra: Sameet Thakkar sent to police custody till 9th November by a court in Mumbai.
He was arrested on 24 October for allegedly making objectionable comments against Maharashtra CM Uddhav Thackeray & State Minister Aaditya Thackeray on social media. pic.twitter.com/UE1U5OP316
— ANI (@ANI) November 3, 2020
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना औरंगजेब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पेंग्विनशी तुलना करणारे ट्विट समितने केले होते. याप्रकरणी शिवसैनिकांच्या तक्रारीवरून मुंबईत दोन आणि नागपुरात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने २० ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
समीत ठक्करला अटक केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन विषाणू कधी कसे आणि कुठे निष्पाप लोकांना ग्रासतील सांगता येत नाही त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि गप्प बसा असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर भाजप नेते निलेश राणे यांनी समित ठक्करला पाठिंबा दिला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.