HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही”, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

मुंबई | “आमच्याकडे त्यांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही”, अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या विधिमंडळ नेते पदाच्या राजीनाम्यानंतर दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीतील काँग्रेस अध्यक्षांकडे पाठविल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. “विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे आहे. मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत”, असे बाळासाहेब थोरात यांनी  शिंदे शाही बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन जनतेशी संवाद साधताना म्हणाले. बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर दिल्ली हायकमांड काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला की नाही ऐवढे सांगा, असे पत्रकारांनी नाना पटोले यांना विचरल्यावर ते म्हणाले, “आमच्याकडे त्यांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही. त्यामुळे मी तेच म्हणाले, तुम्ही जे काँग्रेस पक्षाबद्दल फोर चिंता करत आहे. मी आज मीडियात पाहात होतो. काल कसबा विधानसभेमध्ये काँग्रेस आणि भाजपनेही अर्ज दाखल केलेला आहे. आमचे दोन नेते हे त्यांच्या वैयक्तिगत कामामुळे येऊ शकले नाही. तर त्यांचीही बातमी झाली.

काँग्रेस पक्षाची 15 तारखेला कार्यकारणी बैठक होणार

बाळासाहेब थोरातांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलेले आहे. तुमच्यामुळे हा राजीनामा दिल्याचे त्यांनी पत्रात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर नाना पटोले म्हणाले, “मी सर्व प्रथम बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांना दिर्घा आयुष्य लाभो. आणि त्यांचे राजकीय अजून उत्कर्ष हो, अशी मी त्यांना सदिच्छा देतो. आपण, असे झाले, तसे झाले असे सांगत आहात. असे कुठेही झालेले नाही. कार्यकारणीची बैठक जी असते. ती दर तीन महिन्यांनी घेईची असे, काही लोक तर वर्षवर्ष घेत नव्हते. मागच्या महिन्यात आमची नागपूरमध्ये कार्यकारणीची बैठक झाली. पण, आमच्यासमोर या पोटनिवडणुका आहेत. या पोटनिवडणुकीची रणनिती करायची आणि दुसरे आताच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाला जे घवघवीस यश आले. त्या आमदारांचा सत्कार आणि राहुल गांधी यांच्या बरोबर कन्याकुमारी ते काश्मीर जे भारत यात्री चालले त्यांचा सत्कार. पुढच्या रणनितीची कार्यकारणीच बैठक 15 तारखेला आम्ही ठेवलेली आहे. यात पक्ष पातळीवर सर्व गोष्टींची चर्चा केली जाईल. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात यश येण्यास सुरुवात झालेली आहे. जनतेचा विश्वास काँग्रेस पक्षाबद्दलचा आहे.”

 

संबंधित बातम्या

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

 

Related posts

“तुमच्या कामगिरीबद्दल तुमच्या गुरुला काय वाटतं हे विचारावंच लागेल”, निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना दणका

News Desk

गृह विभागाकधून सौरभ त्रिपाठींच्या निलंबनाचे आदेश

Aprna

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही; संजय राऊतांची माहिती

News Desk