HW News Marathi
महाराष्ट्र

अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया – संदीप देशपांडे

ठाणे | “अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया”, असे आवाहन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिले आहे. मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेने आता आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.

“अविनाश जाधव यांना काल (३१ जुलै) तडीपारीची नोटीस तर दिलीच, पण त्यांच्यावर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याने, अविनाश जाधव यांनी आंदोलन केले, हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे”, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

“सरकार आणि पालकमंत्र्यांना असे गुन्हे दाखल करुन आम्हाला गप्प बसवता येईल असे वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. जेव्हा सरकार आले तेव्हा हे शिवशाहीचे सरकार असे म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचे नाही तर मोघलाईचे आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार” असेही देशपांडे म्हणाले.

“आम्ही सर्वजण अविनाश जाधवच्या समर्थनार्थ ठाण्याला जातोय. आम्ही सर्वजण अविनाशच्या पाठिशी आहोत, आम्हाला कोण अडवतंय ते बघायचं आहे”, असं आव्हान संदीप देशपांडे यांनी दिलं.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी अविनाश जाधव हे आंदोलन करत होते. वसई पालिका आयुक्त दालनात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांतून तडीपार होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परदेश शिष्यवृत्तीसाठी धनंजय मुंडे यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

News Desk

आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपाने धनगर समाजाला फसवले! -नाना पटोले

News Desk

ठरलं! उद्या दुपारी १ वाजता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल होणार जाहीर

News Desk