HW News Marathi
महाराष्ट्र

आंदोलनकर्त्यांनी सांगलीत थेट गोकुळ दूध संघाचा दूध टँकर फोडला 

सांगली | दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत आंदोलन सुरु केले आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी सांगलीत थेट गोकुळ दूध संघाचा दूध टँकर फोडला आहे. तसेच २५ हजार लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले. यावेळी रस्त्यावरील दूध वाहतूक देखील रोखण्यात आली. यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आज दिवसभरात राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी काल(२० जुलै) राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती.. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनास सुरुवात झाली आहे. बुलडाण्यात छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी दुधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुधात ठेवत दुधाला भाव मिळावा म्हणून मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमधून आऊटगोईंग सुरु,२०० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk

महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2013 नुसार स्थापित एसईझेड

News Desk

राज ठाकरे घेणार राज्यपालांची भेट,कोणत्या मुद्दयांवर चर्चा होणार ?

News Desk