HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीत शिक्षक बँकेच्या सभेत मारहाण

सांगली | सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत रविवारी मारहाण झाली आहे. या सभेत सत्ताधारी गटाचे संचालक शशिकांत बजबळे यांना व्यासपीठावरून खाली पाडून बेतम मारहाण करण्यात आली. या गोंधळात सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर करीत पाच मिनिटात सभा गुंडाळली. प्राथमिक शिक्षण बँकेची ६६वी सर्वसाधारण सभा दीनानाथ नाट्यगृहात पार पडली. गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर करीत पाच मिनिटातच सभा गुंडाळली.

या सभेच्या सुरुवातीला बँकेचे व्यवस्थापक बाळासाहेब कोले यांनी अहवाल वाचनाला सुरुवात केली. तेव्हा विरोधी संचालक विनायक शिंदे यांनी व्यासपीठसमोर येत अजेंड्यावरील जागा आणि इमारत खरेदीचा विषय क्रमांक ९ रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. शिंदे समोर येताच सत्ताधारी गटाचे संचालकही त्यांच्या दिशेने धावले याचवेळी एका सभासद व्यासपीठावर धावून आला. आणि त्यांनी संचालक बजबळे यांच्या अंगावर धावून गेला. दोघेही खाली पडले आणि एकमेकांना मारहाण केली. यानंतर इतर संचालकही मदतीला धावून आले असून बजबळे यांना बाजूला काढून त्या शिक्षकाला चोपले. यानंतर सभागृहातील चांगलेच तापले असतानाच कोणीतरी लाईट घालवल्यामुळे पुन्हा जोरदार गोंधळ झाला. आणि सभागृहातील खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आली.

या सभागृहात केवळ दोनच पोलीस असल्यामुळे गोंधळ रोखण्यास हतबल ठरले होते. या मारहाण करणाऱ्या शिक्षकाला व्यासपीठावरून धक्काबुक्की करत खाली ढकलत आणले. याच गोंधळात सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी अजेंड्यावरील विषय अवघ्या दोन मिनिटात वाचून सभा संपल्याचे जाहीर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार! – देवेंद्र फडणवीस

Aprna

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्याव तोडगा काढू विजय वडेट्टीवारांच आवाहन

News Desk