HW News Marathi
मुंबई

 पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

मुंबई | गेल्या ९ दिवसापासून पेट्रोल-डिझेलमध्ये सतत दरवाढी होत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. सातत्याने पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने सेनाभवन चौका पोस्टर लावून निषेध व्यक्त केला आहे.

 

शिवसेनेने पोस्टरमध्ये नेमके काय म्हटले

या पोस्टरमध्ये ‘यह है अच्छ दिन!’ असे लिहले असून २०१५ आणि २०१८ या वर्षा मधील पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसची किंमत यांची तुलना केली आहे. शिवसेनेच्या या पोस्टरखाली माहिम विधानसभा असे लिहले आहे.

मुंबईत आजही (९ सप्टेंबर) पेट्रोल प्रति लिटर १२ पैसे आणि डिझेल ११ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८७.८९ तर डिझेलची प्रति लिटर ७७.०९ झाली आहे.

 

 

तर दिल्लीत पेट्रोल १२ पैसे तर डिझेल १० पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एका लिटरमागे ८०.५० रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर ७२.६१ रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.

काँग्रेसची भारत बंदची हाक

महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने येत्या १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या या भारत बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ब्रेक, वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

News Desk

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ३७० झाडांचे वृक्षारोपण

News Desk

एटीएसने कांदिवलीतून ८ बांगलादेशीना अटक

News Desk