HW News Marathi
महाराष्ट्र

‘तुम्ही सगळे महाराज एकत्र या, मग होऊन जाऊद्या आमने-सामने’, शिवसेना आमदाराचे वक्तव्य

बुलढाणा | शिवसेना आमदार संजय गायकवाड हे गेले काही दिवस चांगलेच चर्चेत आले आहेत. या चर्चेचं कारण कोरोना काळातील काम वगैरे नाही तर विरोधी पक्षनेत्यांच्या तोंडातच कोरोनाचा विषाणू कोंबण्याच्या भाषेमुळे ! गायकवाड यांना लोकप्रतिनिधी असल्याचा विसर पडत असल्याचे अनेकदा त्यांच्या फेसबुक लाईव्हवरील व्हिडिओमधून दिसून आलं आहे.

आता पुन्हा एकदा संजय गायकवाड हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांची एक बातमी स्थानिक वृत्तपत्रात छापून आली होती. या बातमीमध्ये छापून आलेल्या त्यांच्या विधानामुळे वारकरी संप्रदाय तीव्र नाराज झाला आहे. ‘मांसाहार केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढेल, कोरोनातून तुम्हाला देव वाचवायला येणार नाही,’ असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले होते.

यानंतर वारकरी संप्रदायातील अनेक महाराजांनी त्यांना फोन करून या विधानाचा निषेध केला आहे. दरम्यान, अशाच एका कॉलची रेकॉर्डिंग आता व्हायरल होत असून हा संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषणात, सगळ्या महाराजांनी ३१ मे ला आमने-सामने यावं, असं आव्हानच गायकवाड यांनी दिलं आहे.

‘तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज २०-२५ जणांच्या अस्थी जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहित्येय, पण मी जे बोललो ते वास्तव आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे ते बोललो. तुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही सगळे एकत्र या मग बघू. आमचं लॉकडाऊन ३० मे ला उठतंय, ३१ मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमनेसामने बघू काय होतं?’ असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी काही अपशब्द देखील वापरले होते.दरम्यान, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर, ‘शिवसेनेला आणि आपल्याला बदनाम करण्याचे हे भाजपच्या वारकरी सेलचे षडयंत्र आहे,’ अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील दहावी-बारावी बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

News Desk

“बेळगाव झांकी आहे, पण मुंबई अभी बाकी है”, चंद्रकांत पाटलांचा सेनेला टोला!

News Desk

पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

swarit