HW News Marathi
महाराष्ट्र

‘जाणता राजा आणि नेणता राजा यात निवड करायची आहे’, संजय मोनेंची मनसेवर केलेली ‘ती’ पोस्ट वायरल

मुंबई | मनसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या डोंबिवलीमध्येच मनसेला मोठे खिंडार पडले आहे. कारण, मनसेचे दोन नेते पक्ष सोडून गेले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवलीचे शहाराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर डोंबिवलीतले मनसेचे माजी विरोधी पक्षनेते, गटनेते मंदार हळबे यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. यावर अभिनेते संजय मोने यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि ती पोस्ट सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट?

‘ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे, त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला की लगेच “मोठी बातमी”असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते..याचा अर्थ त्या पक्षाच्या “असण्याची” सगळे जण दखल घेतात..हो ना?याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा.. या मधल्या “lock down”च्या काळात सत्ता हाताशी नसतांना ज्यांनी तुम्हाला मदत (साहाय्य खरं तर)केली, ते जरा लक्षात ठेवा.. माझ्या मतदार संघात ,जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे, श्री.नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले, त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे.. कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते.. तर थोडा शब्दप्रयोग बदलतो, तर..आपला हक्क आहे असं समजा…’ असे म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, ‘तळटीप-मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाहीये. फक्त परिस्थिती आणि अवस्था काय होती ते सांगतोय.. इतर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आणि अवस्था होती.. शेवटी आपण ठरवायचं आहे.. जाणता राजा (जो जाणतो) आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी -इप्सित स्थळी सुरक्षित नेतो ) यात निवड करायची आहे.. बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका.. रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं.’

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सोबत विद्यार्थी सेनेपासून कार्यरत राहिलेले राजेश कदम हे शिवसेनेत गेल्याने, हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजेश कदम यांच्यासोबत अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण या मतदारसंघातील हे सर्व पदाधिकारी असल्याचे समजत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खोत, पडळकरांसह रात्रभर चर्चा; आज ST कर्मचारी संप मागे घेणार?

News Desk

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? सेना- काँग्रेसमध्ये नामंतरावरून वाद 

News Desk

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात

News Desk