HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाचा हैदोस, पोलीस महासंचालक संजय पांडे हॉलिडेवर, शिवसेनेची कारवाईची मागणी

मुंबई | महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलीस महासंचालक संजय पांडे राज्याबाहेर सुट्टीवर गेल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय पांडे परवानगी न घेताच चंदिगढला सुट्टीवर गेल्याची माहिती मिळत आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना मात्र नाराज असून कारवाईची मागणी केली जात आहे.

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणारे संजय पांडे विनापरवानगी चंदिगढला कसे गेले? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज आहे. संजय पांडे यांच्यावर तातडीनं कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केल्याची माहिती आहे.

संजय पांडे कोण आहेत?

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजोबा- नातूमधील वाद संवादात आम्ही काय बोलावं… हा त्यांचा घरचा प्रश्न आहे – फडणवीस

News Desk

धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

‘त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे’, नाव न घेता शरद पवारांचा राज्यपालांना टोला

Aprna