HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंगांची चौकशी करण्यास असमर्थ, पोलीस महासंचालक संजय पांडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. पत्राचे कारण असे आहे की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली आहे. ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र. संजय पांडे यांनी आता असमर्थता दाखलल्यामुळे ठाकरे सरकारपुढे अडचण निर्माण झाली आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र आता संजय पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर गृहमंत्री पदाचा देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्यावरील गंभीर आरोप आणि सर्वोच्च, उच्च न्यायालयात राज्य शासनास प्रतिवादी करणे ही तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची कृती अखिल भारतीय सेवा(वर्तणूक) नियमांचा भंग आहे का?याबाबत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश गृहविभागाने पोलीस महासंचालकांना दिले होते.

ही चौकशी नवनियुक्त महासंचालक संजय पांडे हे करणार होते. या प्रकरणात आवश्यक त्या अधिकाऱ्यांची चौकशी करणे, त्यासाठी नोटीस जारी करणे आणि त्यांचे जबाब नोंदवण्याचे अधिकार गृहविभागाने पांडे यांना प्रदान केल्याची माहिती गृहविभागाच्या मिळाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सांगितला आर्थर रोड कारागृहाचा अनुभव

News Desk

राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं हा पोरखेळ, ठाकरे सरकारवर फडणवीसांचा संताप   

News Desk

विस्टाडोम कोचच्या सुरूवातीसह पुणे – मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस पूर्ववत

Aprna