HW News Marathi
महाराष्ट्र

पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिले!

मुंबई |“पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या करून २० दिवस होत आले आहे. त्या प्रकरणाशी संबधित मंत्री संजय राठोड यांनी काल(२८ फेब्रुवारी)) राजीनामा दिला आहे. पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेऊन, या प्रकरणात लक्ष घालावे आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहे”, अशी भूमिका पूजा चव्हाण यांच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी आज पोलिस आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्गाशी चर्चा केल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे.

“पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले आहेत. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्येविषयी बोलायचे नाही” असा आरोपही यावेळी बोलताना पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या देखील उपस्थित होत्या. त्यावेळी शांताबाई राठोड म्हणाल्या की, “पूजा चव्हाणच्या घटनेत तिचे आई वडील अद्यापही काही बोलत नाही. त्या दोघांना संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये देण्यात आले असून त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्यवेळी ते पुरावे समोर आणणार आहे”. तसेच, “मी या प्रकरणी भूमिका मांडत असल्याने माझ्या जीवालाही धोका आहे”, असेही शांताबाई राठोड म्हणाल्या आहेत.

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अखेर वाढत्या दबावामुळे काल राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांवर मोठा दबाव होता. अखेर काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राठोड यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अशा अनेक विषयांवर ते यावेळी बोलले. या पत्रकार परिषेदपूर्वी पूजाचे आई-वडिल आणि बहिण उद्धव ठाकरेंना भेटले. या भेटीत त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र दिलं. पूजा चव्हाण प्रकरणात होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवावी, अशी मागणी पूजाच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेल्या ६ महिन्यात माझ्यावर १० अग्रलेख, मला इतकं महत्व राऊत का देतायत?

News Desk

बीडच्या अविनाश साबळेनं रचला इतिहास! अमेरिकेतील ३० वर्षे जुना विक्रम मोडला

News Desk

राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळय़ांवर राज्य करणे सोपे असते – सामना

News Desk