HW News Marathi
महाराष्ट्र

‘अखेर संजय राठोड समोर आले’, म्हणाले…

नागपूर | शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्या अडचणीत भर पडल्याचं दिसून येत आहेत. त्यांच्यावर अजून एका महिलेने शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशीही माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.

विरोध आणि स्पर्धा न करता खोटे आरोप केले जात आहेत

संजय राठोड आज(१३ ऑगस्ट) सगळ्यांसमोर आले आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. राजकारणात विरोध आणि स्पर्धा न करता खोटे आरोप केले जात आहेत. राजकारण संपण्याचा प्रयत्न होत आहे. राजकारणात आपली मोठी रेष न ओढता, दुसऱ्याची रेष छोटी करतात. राजकारणात पाय ओढण्याचा संपवण्याचा प्रयत्न होत आहे. मीडिया आणि सोशल मीडियात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ब्रेकिंग न्यूजसाठी शहानिशा न करता खोटी बातमी दिली जात आहे. अशा बातम्यामुळे एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. काल एका पत्राचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले. ही स्पर्धा जीवघेणी ठरू नये. माध्यमांनी प्रकरण समजून घ्यावं. माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रकार आहे, असं राठोड म्हणाले आहेत.

कोर्टात प्रकरण प्रलंबित

मी एका संस्थेचा प्रतिनिधी होतो. मीही त्या संस्थेचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणी शाळेतील एका शिक्षकाला काही मेसेज आले. त्याचं नावही संजय आहे. ते माझे सहकारी आहेत. माझ्या नावाने त्यांना चुकीचे मेसेज आले. त्यांनी पोलीसात तक्रार केली आहे. कालांतराने माझं एक प्रकरण झालं. त्याचा आधार घेऊन काही केल्यास नोकरी मिळेल असा सल्ला त्या लोकांना कुणी दिला असेल. त्यामुळे मलाही मेसेज येणं सुरू केलं. त्यामुळे मीही 28 जुलै 2021 रोजी वडगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली, असं त्यांनी सांगितलं. माझ्यावर करण्यात आलेले आरोप नैराश्यातून, मानसिकतेतून करण्यात आली आहे. संस्थेत कामाला लागलो पाहिजे या मानसिकततेतून हा आरोप झाला असेल, असं ते म्हणाले आहेत.

माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जातोय

माझ्या शाळेतील कर्मचारी संजय जैस्वाल यांनीही तक्रार केली आहे. पोलिसांनाही त्याची कल्पना आहे. जे काही आहे ते तपासातून पुढे येणारच आहे. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणात माझी ही बाजू यावी म्हणून मी समोर आलोय, असं सांगतानाच एखाद्या प्रकरणात टार्गेट करून मागे लागण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. मी 30 वर्षापासून राजकारणात आहे. पण असे आरोप करून राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रकरणातही मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, असं ते म्हणाले आहेत.

मी त्याचा सामना करेन

संजय राठोड यावेळी बोलताना म्हणाले, ” मी रडणार नाही तर लढणार आहे. मी रडणारा नाही, लढणारा आहे. त्यामुळे मी त्याचा सामना करेल. सुपारी घेऊन मागे लागण्याचा प्रयत्न झाला. कालपासून आरोप सुरू आहे. कोरड्या झाडाला कोणी गोटे मारत नाही. फळाने भरलेल्या झाडालाच गोटे मारतात. माझी काम लोकांना माहीत आहे. मीडियाला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

अनोळखी नंबरवरुन धमक्या

मला अनोळखी नंबरवरुन धमक्या दिल्या गेल्या. माझं राजकीय आयुष्य संपवण्याची धमकी आली होती. त्याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. मला पाच मोबाईल नंबरवरुन धमकी देण्यात आली आहे. हे नंबर पोलिसांना दिले असून चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व फॉरवर्डेड मेसेज आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तिला कोणी तरी मेसेज लिहून देत असल्याचं स्पष्ट होतं. तसेच तुमचं करिअर संपवण्यासाठी विरोधकांची साथ घेऊ असंही मेसेजमध्ये म्हटलं आहे. मेसेजमध्ये लिहीलं होतं “ तुमच्या राजकीय विरोधकांची मला साथ आहे,” असा दावा त्यांनी केला.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर रेमिडिसिव्हीरसाठी आम्ही सुजय विखेंचाच नंबर दिला असता ! जयंत पाटलांचा टोला

News Desk

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन अन् स्वाक्षरी मोहीम

Aprna

रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

News Desk