HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारची पहिली विकेट, संजय राठोड यांनी दिला राजीनामा

मुंबई | राज्यातील सगळ्या मोठी बातमी येत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात अखेर ठाकरे सरकारमधील पहिली विकेट गेली आहे m शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आज (२८ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज संजय राठोड आपल्या पत्नीसोबत वर्षा बंगल्यावर गेले होते. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आलं आणि राजकीय वातावरण चांगलचं तापलं.

राज्यातील प्रमूख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. तसेच, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील केली होती. भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या आणखी

नेत्यांनी या प्रकरणात आक्रमक भुमिका घेतली होती. अखेर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला आहे. उद्यापासून (१ मार्च) राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांची होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर रामदास आठवलेंची मिश्किल टिप्पणी

swarit

राज ठाकरेंचा इशारा, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल !

News Desk

महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna