HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’, संजय राठोड यांची सगळ्यांना हात जोडून विनंती

वाशिम |  ‘माझ्यावर झालेले आरोप हे तथ्यहीन आहे. माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करू नका, मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’ अशी विनंती शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी केली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पोलीस चौकशी सुरू आहे. जे काही सत्य या चौकशीतून समोर येईल, ते सर्वांनी पाहावे’, असंही राठोड म्हणाले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड अडचणीत सापडले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. पण गेल्या १५ दिवसांपासून प्रसारमाध्यमांपासून दूर असलेले संजय राठोड पोहोरादेवी मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने समोर आले. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

‘मी १५ दिवस कुठेही गेलो नव्हतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आई वडील वृद्ध आहे. त्यांच्यासोबत 10 दिवस होतो. या काळात मी त्यांच्यासोबत होतो. या काळात कोणतेही काम थांबले नाही. 10 दिवस शासकीय बंगल्यावरून काम पाहिले. अमोल राठोड कोण आहे, हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वच जण फोटो काढत असतात. पण, एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’, अशी विनंती संजय राठोड यांनी केली आहे.

Related posts

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी तिघांना २० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा

News Desk

Budget 2019 : नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प | मुख्यमंत्री 

News Desk

राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाच्या प्रतिष्ठेची व त्या पदाचे प्रचंड अवमूल्यन करणारी आहे

News Desk