HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना नेते संजय राठोड आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना राजकीय गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या मार्गांनी पूजा चव्हाण आत्महत्येचा तपास करत आहेत. त्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे संजय राठोड हे राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आज (२८ फेब्रुवारी) राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधी संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच राठोड राजीनामा देण्याआधी बंजारा समाजाचे महंत तसेच बंजारा समाजाशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतील, असेही म्हटले जात आहे.

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. सरकारवरील वाढता दबाव लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे संजय राठोड हे स्वत:हून राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे. ही बैठक होण्याआधी राठोड हे उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यावेळी दोघांमध्ये राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राठोड हे बंजारा समाजाचे महंत आणि बंजार समाजाशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यासाठी ते पुन्हा पोहरादेवीला जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास आठवले घेणार अमिताभ बच्चन यांची भेट

News Desk

दरड सत्र सुरूच, रायगडमधील हिरकणी वाडीत दरड कोसळली..!

News Desk

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही ! उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

News Desk