HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड पोहरागडला जाणार, शासकीय दौरा जाहीर

औरंगाबाद | पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड आज (२४ फेब्रुवारी) पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण ११.३० वाजताच्या सुमारास संजय राठोड पोहरादेवीला येतील, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे –

१- संजय राठोड हे सकाळी आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील.

२- सकाळी ११.३० वाजता ते पोहरागड येथे पोहचतील.

३- दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील.

४- दुपारी २.३० च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील.

५- दुपारी ३.३०च्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील.

६- यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येईल! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

‘पाठीत खंजीर खुपसणे’अशी ज्यांची ओळख त्यांनी निष्ठेविषयी बोलू नये !

News Desk

विधानसभेत नामांतराचे तीन प्रस्ताव मंजूर; दोन जिल्हे आणि एका विमानतळाचे नाव बदलले

Aprna