HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मंत्री संजय राठोड पुन्हा आले चर्चेत..नेमकं काय झालं ?

यवतमाळ | माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणानंतंर त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामादेखील द्यावा लागला. आता पुन्हा एकदा नव्या विषयामुळे ते चर्चेत आले आहेत. माजी वनमंत्री तथा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या वाहनासमोर एक दिव्यांग युवक झोपून अचानक आडवा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या भागातील रस्त्याच्या प्रलंबित कामासाठी त्याने हे पाऊल उचलले आणि लागलीच वाहन थांबवून चर्चेचे आश्वासन संजय राठोड यांनी दिले.

वैभव नगरमधील भास्कर वाघमारे हा दिव्यांग युवक राठोडांच्या भेटीसाठी आपली समस्या घेऊन आला होता. मात्र बराच कालावधी होऊन त्याला भेट मिळाली नाही. अशात आमदार राठोड हे विश्रामगृहच्या बाहेरच्या दिशेने वाहन घेऊन निघाल्याने दिव्यांग भास्करने राठोडांच्या वाहनापुढे चक्क झोपून त्यांचा रस्ता अडविला. यावेळी लागलीच पोलिसांनी वाघमारे यास उठवून त्याला आमदार राठोड यांच्याकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ वैभव नगर येथे भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली.

संजय राठोड याआधी का आले होते चर्चेत ?

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानं राज्यातील राजकीय वर्तुळ ढवळून निघालं. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने लावून धरली. मात्र, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण संजय राठोड यांनी दिले होते. अखेर या प्रकरणात राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला.मात्र, त्याचबरोबर आपण आमदारकीचा राजीनामा दिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली भूमिका असून, चौकशीनंतर सत्य समोर येईल, असे ते राजीनामा दिल्यानंतर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

“…तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा”, खोतांची परबांवर टीका

News Desk

अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची मोठी चूक! – शरद पवार

Aprna