HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या मंत्र्याकडून बीफ खाण्याचं समर्थन!, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

मुंबई। भाजप आणि शिवसेने मधले वाद आता विकोपाला जाताना दिसत आहे. रोज या दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतात. ‘बीफ’वरुन ‘मोदी-1’ सरकारच्या काळात जे झुंडबळी गेले, ते मानवतेस काळिमा फासणारे प्रकार होते. मेघालयचे भाजपचे मंत्री सनबोर शुलाई यांनी ‘ बीफ’ खाण्याचे समर्थन केलंय. बीफवरची बंदी उठली काय? सनबोर शुलाई यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा वगैरे दाखल करा, अशी मागणी आम्ही करणार नाही, पण ‘बीफ’ प्रकरणी ज्यांचे ‘झुंडबळी’ गेले, बीफ बाळगले म्हणून ज्यांना अपमानित ठरवून गुन्हे दाखल केले गेले, त्या सगळ्यांची माफी मागा! , अशी मागणी करत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

मासे कसले खाता? बीफ खा बीफ!

संजय राऊतांनी मेघालयाच्या भाजप नेत्यावरून आता जोरदार टीका केली आहे. मेघालयात भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुलाई यांनी देशातील समस्त मांसाहारी मंडळींना एक दिव्य संदेश दिला आहे. मंत्रिमहोदय सांगतात, ‘लोकहो, चिकन, मटण, मासे कसले खाता? बीफ खा बीफ! गोमांस खा. त्यातच मजा आहे!’ गोमांस भक्षणाची ही अशी तरफदारी करणाऱ्या भाजप मंत्र्यांनी असे हिंदुत्वविरोधी वक्तव्य करूनही या महाशयांचा बालही बाका झाला नाही. भाजप हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे.

बीफवरुन मोदींच्या काळात जे झुंडबळी गेले ते मानवतेला काळीमा फासणारे

‘बीफ’वरुन ‘मोदी-1’ सरकारच्या काळात जे झुंडबळी गेले, ते मानवतेस काळिमा फासणारे प्रकार होते. कोणाच्या घरात कोणत्या प्राण्याचे मांस शिजवले आहे, कोणत्या वाहनांतून गाय, बैल, म्हैस नेत आहेत यावर पाळत ठेवणारी पथके गेल्या निवडणूक काळात निर्माण केली गेली. ही पथके देशभरातील पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये घुसून तेथील किचनमध्ये गोमांस शोधमोहिमा राबवीत होती.

दुसऱ्या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला

मोदी सरकारने केंद्रात गोवंश हत्याबंदीचा कायदाच केल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. शेतकऱ्यांवरील भाकड गाई पोसण्याचे ओझे वाढले, पण गाय ही देवता नसून एक उपयुक्त पशू आहे या वीर सावरकरी भूमिकेचे समर्थन करणे हादेखील अपराधच ठरु लागला आहे. अर्थात दुसऱ्या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला गेला असून गोमातांचा दर्जा खाली गेला आहे. जागोजाग भाजपचे मंत्री व पुढारीच ‘बीफ’ खाण्याचे समर्थन करीत आहेत व सरकारमधील साध्वी, संत, महंत, मठाधीश गोमातांचे हंबरडे निमूटपणे ऐकत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केसेस कशा रद्द करायच्या हे अजितदादांकडून शिकावं”, नारायण राणेंची पवारांवर टीका!

News Desk

दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणावे, रोहित पवारांची पंतप्रधानांना विनंती

News Desk

“काँग्रेसमध्ये रोज लाथा बुक्क्यांचा मार”- आशिष शेलार

News Desk