मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब, काँग्रेसचा स्वबळाचा नारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तापालटाच्या चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकार त्यांच्या ओझ्यानंच पडेल, तेव्हा आम्ही सक्षम पर्याय देऊ, असं वक्तव्य केलंय. असं असलं तरी उद्धव ठाकरे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील, असा दावा शरद पवार यांनी केल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून राऊतांनी या भेटीची माहिती दिली आहे.
मा.श्री.शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा
झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही.
उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे श्री.पवार म्हणाले. @PawarSpeaks @OfficeofUT— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2021
राऊत यांनी काल (२३ जून) शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं राऊतांनी सांगितलं. इतकंच नाही महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबाबत पवारांच्या मनात शंका नसल्याचंही राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे पवार म्हणाले’, असं ट्वीट राऊत यांनी केलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.