HW News Marathi
देश / विदेश

सुशांतच्या वडिलांनी २ लग्न केली नाहीत, संजय राऊत खोटं बोलतायत!

पटणा | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळेच वळण आले आहे. नेपोटिझम कडून आता याला आता राजकीय वळण आले आहे. या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येऊ लागल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात आता हात घातला आहे. त्यांनी सुशांतच्या वडिलांवर त्यांनी २ लग्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, सुशांतच्या मामाने राऊत खोटे बोलत आहेत, असे म्हणत हा आरोप खोडून काढला आहे.

सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते असा दावा राऊत यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून केला होता. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप केला होता. यावर सुशांतचे मामा आर सी सिंग यांनी सांगितलं की, “सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. संजय राऊत चुकीचे बोलत आहेत”.

“संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चुकीचे वक्तव्य केले आहे. राऊत असे वक्तव्य करून प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. असे काहीतरी बोलून एखाद्याची प्रतिमा मलिन करणे ही चांगली बाब आहे का? बिहारमध्ये जे राहतात त्या सगळ्यांना माहिती आहे, की सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केलं आहे, असं सिंग म्हणाले आहेत.

काय केला होता आरोप?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे भाजपाचे नेते आहेत आणि २००९मध्ये त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते.

सुशांतचे त्यामुळे वडिलांशी भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे’ असं म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींनी आपल्या देशाची प्राचीन परंपरा जगभरात पोहचवण्याचे काम केले !

News Desk

रवीकुमार दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश!

News Desk

रेल्वे मंत्रालयाची नवी घोषणा, १२ क्लस्टरमध्ये १०९ जोडी मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जाणार

News Desk