HW News Marathi
महाराष्ट्र

“आता अमित शाहांना हिंदुत्वविरोधी म्हणणार का?”

मुंबई | देशात कोरोना रुग्णांचा कहर पुन्हा वाढत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची भीतीही संभवली आहे. मात्र भाजपवाले मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करत आहेत. पण काळजी घेण्याचं आवाहन, नियमावली केंद्राने पाठवली आहे. जर भाजप नेत्यांवर कारवाई केली तर हे आम्हाला हिंदुत्वविरोधी ठरवतील. आता अमित शाहांच्या गृहखात्याने नियमावली जारी केली आहे, त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार का असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे.

ईडी भाजप चालवतेय का भाजपला ईडी चालवतेय?

यावेळी संजय राऊत यांनी भाजपला प्रश्न विचारले आहेत. “नोटीस येत आहेत, त्याबाबत राजकीय दबाव आहे. एका पक्षाचे, भाजपचे नेते सोशल मीडियावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची यादी जाहीर करत आहेत, यांना ईडी बोलवणार. हे ईडीचं समन्स आहे की भाजपचं हा संभ्रम आहे. भाजपचे प्रमुख लोक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १० लोकांची यादी जाहीर केली, भाजपचे लोक ईडी कार्यालयात बसले की ईडीचे लोक भाजप कार्यालयात हे शोधण्याची गरज”, असं ते म्हणाले आहेत.

अनिल परब यांना ईडी नोटीस आली, मात्र ते आज जाणार नाहीत. ईडी काय करतेय, सीबीआय काय करतेय? कुणाला वॉरंट जातंय, कुणाची संपत्ती जप्त होतेय, याची यादी भाजपवाले सोशल मीडियावर टाकत आहेत. ईडी भाजप चालवतेय का भाजपला ईडी चालवतेय?

ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आम्ही

“आम्हाला फक्त डिफेन्सचं रडार माहिती आहे, देशाच्या शत्रूवर हल्ले केले जातात. ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आम्ही असेल तर ते आम्हाला देशाचे दुष्मन मानतात का, लावा रडार आमच्यावर”, असं राऊत म्हणाले आहेत.

केंद्र सरकार अ‍ॅक्शन घेणार का?

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी काल(३० ऑगस्ट) दिवस भारत राज्यात ठिकठिकाणी मंदिरं सुरु करण्यासाठी आंदोलन केलं होतं, यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपवाले मंदिरासाठी आंदोलन करत आहे, यावर केंद्र सरकार अ‍ॅक्शन घेणार का? आम्ही घेतली तर हिंदुत्वविरोधी म्हणाल. केंद्राने नियमावली दिली, गृहमंत्री अमित शाहांच्या खात्याने दाखवली आहे, अमित शाह हिंदुत्वविरोधी आहेत का? केंद्र सरकारचे नियम पाळत नाही, मग केंद्र सरकारही हिंदुत्वविरोधी आहे का? असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्याची ही वेळ नाही, संभाजीराजेंची भूमिका !

News Desk

“त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर…”, जयंत पाटील यांनी व्यक्त केली खंत

News Desk

राज्यात लॉकडाऊनच्या काळात एकूण १६१ गुन्हे दाखल तर ३६ आरोपींना अटक, महाराष्ट्र सायबरची प्रभावी कामगिरी

News Desk