मुंबई | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी काल (१ ऑक्टोबर) धक्काबुक्की केली होती. या घटनेबाबत अनेक राजकीय नेत्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे.
“राज्यातील एका मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला आहे. याबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवायचा नाही, ही कुठली लोकशाही? जर कोणी आवाज उठवला तर तुम्ही त्याची कॉलर पकडून खाली पाडणार असाल तर हा या देशाच्या स्वातंत्र्यावरचा, इथल्या लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे.”
“विरोधी पक्षाने बोलू नये, ही सरकारची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. आता या देशातील प्रमुख पक्षांनी, त्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जागं व्हायला पाहीजे. नाहीतर त्यांचीदेखील कॉलर पकडून त्यांना खाली पाडण्यात येईल. परंतु या देशाचं दुर्दैव आहे की, इथल्या प्रमुख नेत्यांना अद्याप जाग आलेली नाही.”
#WATCH Shiv Sena leader Sanjay Raut says, "Rahul Gandhi is a national political leader. We may have differences with Congress but nobody can support Police's behaviour with him…His collar was caught & he was pushed to the ground, in a way it's gangrape of country's democracy." pic.twitter.com/qhcC8qLiqi
— ANI (@ANI) October 2, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.