HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

“पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास रक्तरंजित,” बंगाल हिंसाचारावर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई | देशात २ मे रोजी लागलेल्या ५ राज्यांच्या निवडणूकीच्या निकालाचे वेगळे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. या निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये हिंसा उसळली आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक बाब आहे, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालाबाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतंय त्याचा शोध घ्या, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी आज (४ मे) संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं.

पश्चिम बंगालचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारक आहे. देशातील मनाची भावना या निकालात प्रतिबिंबीत झाली आहे. परंतु, या निकालानंतर बंगालमध्ये उसळलेली हिंसा चिंताजनक आहे. दोन्ही बाजूने शांतता राखली पाहिजे. केंद्राने आणि बंगालच्या सरकराने संयमाने राहावे लागेल. बंगालचा इतिहास रक्तरंजित आहे. हे खरे आहे. पण सर्वांनी देशाची परिस्थिती पाहावी. कोरोनाची परिस्थिती ओळखून काम करावं. एकमेकांना धमक्या देणं थांबवावं, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे की बाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतोय याचा शोध घ्या, या हिंसेचा तपास झालाच पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

“पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु असल्याचा बातम्या फार चिंताजनक आणि दु:खद आहेत. पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांना जोरदार बहुमत दिलं आहे. पश्चिम बंगालचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रतिक्रिया तिथे उमटली आहे. असं असताना दोन्ही बाजूंनी संयम राखणं गरजेचं आहे. विशेषत: जो पक्ष सत्तेत असतो त्यांचं हे काम असतं. पण टाळी एका हाताने वाजत नसते,” असं राऊत म्हणाले आहेत.

पुढे ते असंही म्हणाले की, “दुर्दैवाने पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास हा नेहमीच रक्तरंजित आणि हिंसाचाराने भरलेला आहे. देशाची स्थिती ही अत्यंत गंभीर आहे. सगळ्यांनी निवडणुकांमधील मतभेद-वाद मिटवून करोनाविरोधात लढण्याची गरज असताना सुद्धा हे का होत आहे याचा विचार दोन्ही बाजूंनी करायला हवा. एकमेकांना धमक्या इशारे देणे थांबवायला पाहिजे”. “हिंसाचार घडवण्यात खतपाणी घालणारे हे पश्चिम बंगालमधील आहेत की बाहेरून कोणी याला उत्तेजन देत आहे हे देखील पाहायला हवं,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Related posts

“मी शरद पवारांच्या तालमीत तयार झाले हे सांगायला मला संकोच वाटत नाही – चित्रा वाघ

News Desk

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी पास वाटप

News Desk

सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी !

News Desk