HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

आम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही !

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक हे लोकसभेत मंजूर होऊन राज्यसभेत आले आहे. या विधेयकाला जे विरोध करतील ते देशद्रोही आणि समर्थन करतील ते देशभक्त हे चुकीचे असल्याचे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, “देशात अनेक ठिकाणी नागरिकता सुधारणा विधेयकाचा विरोध होत आहे. जे विरोध करत आहेत ते सुद्धा देशाचे नागरिक आहेत. आम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. आणि आमच्या शाळेचे हेडमास्तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, अटल बिहारी वाजपेयी होते. श्यामप्रसाद मुखर्जीही होते,” असे ते राज्यसभेत म्हणाले.

दरम्यान, “या विधेयकाविरोधात देशातील इतर राज्यात मतप्रवाह आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीच्या राज्यात असे असणे स्वाभाविक आहे. आणि हे योग्य आहे. पण जे या विधेयकाला समर्थन करणार नाहीत ते देशद्रोही असतील,” असे ठरवणे चुकीचे आहे, ते यावेळी म्हणाले. “हे पाकिस्तानचे सदन नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. देशातील जनतेने सर्वांना मतदान केले आहे. जर पाकिस्तानची भाषा तुम्हाला आवडत नसेल, तर पाकिस्तानला संपवा. त्याबाबत आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असेही ते म्हणाले.  “देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेर काढले पाहिजे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे. ती लाखो-करोडो लोक आपल्याकडे येत आहेत. मग त्यांना आपण मतदानाचा अधिकार द्यायचा का? असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.”

विधेयक संमत करण्यासा राज्यसभेतील बहुमताचे गणित

नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (११ डिसेंबर) राज्यभेत मांडले. राज्यसभेत या विधेयकावर ६ तास चर्चा होणार आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारला १२० खासदारांच्या मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेत सध्या २३९ सदस्य आहे. यांत भाजपचे ८१ खासदार आहेत. त्यामुळे भाजपला राज्यसभेत आणखी ३९ मतांची गरज लागेल. जेडीयूने या विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. अण्णा द्रमुक, जनता दल (संयुक्त), अकाली दल तसेच राष्ट्रपतीनियुक्त सदस्य मिळून ही संख्या १२४ हून अधिक होईल आणि ती १३० पर्यंतही जाईल, असा भाजपचा दावाआहे.काँग्रेस व मित्रपक्ष तसेच आप व वायएसआर काँग्रेस व काही अन्य मिळून ११२ सदस्य असल्याचे आता दिसत आहे.  त्यामुळे जेडीयूचे सहा खासदार राज्यसभेत विधेयकाला विरोध करतील. शिवसेना व जनता दल (संयुक्त)ने भूमिका बदलल्यास विधेयकाला विरोध करणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी शक्यता आहे.

 

 

 

 

Related posts

पत्रकार ते पंतप्रधान, अटल बिहारी वाजपेयी

मानसी जाधव

धक्कादायक…जेट एअरवेजच्या फ्लाइटमधील प्रवाशांच्या कान-नाकतून रक्त

News Desk

केंद्राच्या ‘अरे’ला ममता ‘का रे’ने प्रत्युत्तर दिले !

News Desk