HW News Marathi
महाराष्ट्र

‘विरोधी पक्ष मोकळा आहे, डोकं रिकामं असतं’, संजय राऊतांची विरोधकांवर टीका

नगर | शिवसेना खासदार संजय राऊत हे नेहमीच विरोधकांवर टीका करत असतात. राज्यातजी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यावरही आता संजय राऊतांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधी पक्ष मोकळा आहे. डोकं रिकामं असतं. आरोप करतच असतात, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. राज्याने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याबाबत राऊत यांना छेडण्यात आले. त्यावर राऊत यांनी ही टीका केली आहे.

पंतप्रधानांनी पाहणी करावी

राज्यातजी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा पाहणी करण्यासाठी अनेक राजकारणी घटनास्थळी पोहोचले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील तिथली पाहणी करून आले आहेत. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात यावं. हेलिकॉप्टरवरून घिरटी मारावी आणि गुजरातला दिले तसे हजार कोटी द्यावेत. ताबडतोब द्यावेत, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी काही निर्णय घेतले आहेत. आता तर प्रत्येकाच्या खात्यावर दहा हजार जमा होत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

लांडगा आला रे आला

संजय राऊत या वेळी विरोधकांवर चांगलेच भडकलेले दिसून आले. लांडगा आला रे आला असा टोमणा त्यांनी विरोधांना लगावला आहे. हा महाराष्ट्र आहे. एवढेच सांगू शकतो. विरोधक सरकार पाडण्याचा प्रयत्न करून थकलेले आहेत. भिंतीवर डोकं अपटून झालंय. डोकं फुटलंय, भिंत तशीच आहे. लांडगा आला रे आला… लांडगा आला रे आला… असं ते म्हणत असतात. पण लांडगा वगैरे काही येत नाही. बोलू द्या. त्यांचा वेळ जातोय ना त्यात. त्यांनी वेळ घालावा, अशी खोचक टीका करतानाच हे सरकार उरलेला तीन वर्षाचा काळ अगदी व्यवस्थितपणे पार पाडेल. त्यामुळे या काळात तरी कुणी पुन्हा येण्याची अजिबात शक्यता नाही. आणि भविष्यातही आजचीच व्यवस्था कायम राहील ही मला खात्री आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील पाच महाविद्यालये झाली ‘स्वायत्त’ 

News Desk

आता वाढला नव्या व्हेरियंटचा धोका;, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला ‘हा’ इशारा

News Desk

राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले आणि गेले, वरवरच्या पाहणी दौऱ्यानं शेतकरी संतप्त!

News Desk