HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सर्वाधिक जागा मिळाल्या तरी…’बिहारचे सूत्र भाजपने महाराष्ट्रात वापरले नाही ! – सामना

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्यापुढे नमते घेणाऱ्या भाजपवर शिवसेनेने टीकेची तोफ डागली आहे. भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे म्हणणाऱ्या भाजपने बिहारचे हेच सूत्र महाराष्ट्रात वापरले नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेने भाजपला डिवचले आहे.

नितीशबाबू हा एकच चेहरा बिहारात आहे, असे सगळ्यांनी ठरवूनच टाकले आहे. पण बिहारचे हे सूत्र भाजपने महाराष्ट्र किंवा इतरत्र वापरले नाही. नितीशकुमार ‘एनडीए’त जाऊन येऊन राहिले. तरी ते निष्ठावान, जुने सहकारी ठरतात. त्याबद्दल नितीशकुमारांच्या कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? ते रहस्यच आहे,’ असे शिवसेनेने आजच्या (२० ऑक्टोबर) सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिले आहे. त्यांनी गडबड अशी केली आहे की, एक झगमगाट करणाऱ्या ‘स्ट्रीट लाइट’ने उजळून निघालेल्या फ्लायओव्हरचा फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला शीर्षक दिले, ‘मुझफ्फरपूर स्ट्रीट लाइट योजना.’ आता जागरुक मतदारही कामास लागले व हा भव्य सुंदर प्रकाशमान रस्ता शोधू लागले. तेव्हा संपूर्ण मुझफ्फरपूर पालथे घातले तरीही मंत्र्यांनी ‘टाकलेला’ या फोटोतील रस्ता मिळाला नाही. कारण नितीशकुमारांच्या मंत्र्यांनी ‘स्वतःचे कार्य’ म्हणून टाकलेला हा फोटो प्रत्यक्षात हैदराबादमधील रस्त्याचा होता. तर बिहारच्या विकासाचा खरा चेहरा हा असा आहे! बिहारच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, यावर आतापासूनच पैजा लागल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे बिहारात बारा सभा घेतील, असे जाहीर केले आहे.

गृहमंत्री अमित शहादेखील प्रदीर्घ काळानंतर कामावर परतले आहेत. आपण ‘मस्त’ आहोत व आपल्या तब्येतीविषयी ज्या वावडय़ा उठवण्यात आल्या त्या चुकीच्या आहेत हे त्यांनी एका वृत्तवाहिनीस मुलाखत देऊन स्पष्ट केले. आम्हीही त्यांना उत्तम आरोग्याची कामना करीत आहोत. मुलाखतीचा गोषवारा अर्थातच राजकीय आहे व त्यात बिहारची चर्चा झालीच आहे. श्री. शहा यांनी स्पष्ट केले की, भाजपला बिहारात सर्वाधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील. श्री. शहा यांचे हे विधान महत्त्वाचे आहे. श्री. शहा म्हणतात, नितीशकुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. इथे एक दुरुस्ती करणे गरजेचे आहे. नितीशकुमार हे जुने व भरवशाचे सहकारी आहेत हे विधान तर्कसंगत नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हे भारतीय जनता पक्षाबरोबर नव्हते. त्यांच्या ‘जदयु’ पक्षाने लालू यादवांच्या ‘राजद’शी आघाडी करून निवडणुका लाढविल्या.

त्या निवडणुकीत नितीशकुमार यांचा मुख्य शत्रू भाजप होता. भाजपनेही नितीशकुमारांवर हल्ले करण्याची मालिकाच चालवली होती. 2014 सालात व 2020 च्या निवडणुकीत साम्यस्थळ एकच, ते म्हणजे तेव्हाही आपल्या जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्री नितीशबाबूच होतील, अशी घोषणा लालू यादव यांनी केली होती. त्याप्रमाणे ‘जदयु’च्या जागा लालू यांच्या पक्षापेक्षा कमी येऊनही मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार विराजमान झाले. पण मध्येच लालू यादवांशी काडीमोड घेऊन ते भाजपशी सत्तासंग करून बसले. आताही अमित शहा यांना जाहीर करावे लागले की, आम्ही जास्त जागा जिंकल्या तरी मुख्यमंत्री नितीशबाबूच! नितीशबाबू हा एकच चेहरा बिहारात आहे, असे सगळ्यांनी ठरवूनच टाकले आहे. पण ‘सर्वाधिक जागा मिळाल्या तरी…’ हे बिहारचे सूत्र भाजपने महाराष्ट्र किंवा इतरत्र वापरले नाही. नितीशकुमार ‘एनडीए’त जाऊन येऊन राहिले. तरी ते निष्ठावान, जुने सहकारी ठरतात. त्याबद्दल नितीशकुमारांच्या कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? ते रहस्यच आहे.

बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिले आहे. त्यांनी गडबड अशी केली आहे की, एक झगमगाट करणाऱ्या ‘स्ट्रीट लाइट’ने उजळून निघालेल्या फ्लायओव्हरचा फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला शीर्षक दिले, ‘मुझफ्फरपूर स्ट्रीट लाइट योजना.’ त्यापुढे जात हे महाशय सांगतात, मुझफ्फरपूरचे रस्ते कसे झगमगाट करत आहेत ते बघा. मुझफ्फरपूरमध्ये एकूण 17 हजार 554 झगमगते ‘स्ट्रीट लाइट’ आपल्या कार्यकाळात लावण्यात आले आहेत. काम केले आहे, काम करीत राहीन. मुझफ्फरपूरचा विकास असाच सुरू राहील, असे लिहून मंत्री महोदय मोकळे झाले. आता जागरुक मतदार कामास लागले.

व हा भव्य सुंदर प्रकाशमान रस्ता शोधू लागले. तेव्हा संपूर्ण मुझफ्फरपूर पालथे घातले तरीही मंत्र्यांनी ‘टाकलेला’ या फोटोतील रस्ता मिळाला नाही. कारण नितीशकुमारांच्या मंत्र्यांनी ‘स्वतःचे कार्य’ म्हणून टाकलेला हा फोटो प्रत्यक्षात हैदराबादमधील रस्त्याचा होता. तर बिहारच्या विकासाचा खरा चेहरा हा असा आहे! सुशांतसिंह राजपूतच्या नावावर मते मागणे सुरूच आहे व आता हे इतर राज्यांतील विकास कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचे भुरटे-भामटे उद्योगही नव्या दमाने सुरूच आहेत. बिहारमध्ये कुपोषण, भूक, रोजगाराचा प्रश्न आगडोंबासारखा उसळला आहे. आमचे बिहारी मजूर इतर राज्यांत जातात म्हणून त्या त्या राज्यांचा विकास होतो वगैरे बोलणे ठीक आहे हो, पण हे मजूर बिहार सोडून परराज्यांत जातात ते पोटाची आग विझवण्यासाठी.

जे मजूर इतर राज्यांत जाऊन विकास शिल्प घडवतात त्याच श्रमणाऱया हातांच्या ताकदीवर नवा बिहार, विकासाच्या मार्गावरील बिहार का घडवता आला नाही? खरोखरच या श्रमिकांच्या हातांना त्यांच्याच राज्यात काम मिळाले असते तर हैदराबादच्या रस्त्यांचे झगमगणारे फोटो ‘आपलेच’ म्हणून ढोल पिटण्याची नामुष्की आली नसती. सत्तेवर राहूनही इतक्या वर्षांनंतर ही वेळ यावी हे बिहारच्या जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. नोकरीसाठी बिहारचे मजूर महाराष्ट्रात आणि प्रचारासाठी हैदराबादचे झगमगीत रस्ते बिहारात. याच रस्त्यांवर बहुधा ‘भाजप-जदयु’ची संयुक्त प्रचार सभा होईल असे दिसते. नितीशकुमार हे भाजपचे भरवशाचे जुने साथी असल्याने त्यांच्याविषयी जास्त न बोलणेच योग्य!

Related posts

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार 

News Desk

काँग्रेस पक्ष हा केवळ तुमच्या किंवा राहुलजींच्या हातात सुरक्षित आहे, राजीव सातव यांचे सोनिया गांधींना पत्र

News Desk

पुण्यातील प्राध्यापकाची इराणी विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

News Desk