HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार हे प्रेम करावं असं नेतृत्व आहेच, राऊतांचा राज्यपालांना टोला

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत.त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन राज्यपालांना खोचक टोला लगावत ते असंही म्हणाले की, शरद पवार हे प्रेम करावं असं नेतृत्व आहेच. तसेच, राज ठाकरे यांनी राज्यपालांचा सल्ला ऐकत शरद पवारांना काल (३० ऑक्टोबर) फोन केला होता. आणि बातचीतही केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात ८ दिवस संचारबंदी!

News Desk

“लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा”

News Desk

अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाययोजना सशक्त आणि गतिमान करण्याची आवश्यकता!

News Desk