मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (७ फेब्रुवारी) सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या उदघाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी भाषणात त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केली.‘आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती’, असेही वक्तव्य अमित शाह यांनी केल्यानंतर त्यांना त्याच शैलीत शिवसेनेकडून उत्तर दिले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपचे पुन्हा एकदा कान टोचले आहेत. “घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है”, म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
“तुफान ज्यादा हो तो,
कश्तियाँ डूब जाती है
और घमंड ज्यादा हो तो,
हस्तीयाँ डूब जाती है
असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जय हिंद !!!
जय महाराष्ट्र !!! pic.twitter.com/Z5icLpoNs9— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2021
नेमके प्रकरण काय ?
शिवसेनेने भाजपचा हात सोडून राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांनतर तब्बल दीड वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर ७ फेब्रुवारीला थेट वक्तव्य केले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना शाह यांनी ‘शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती,’ असे वक्तव्य केले होते. तब्बल दीड वर्षांनी अमित शाह यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधल्यामुळे शाह यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आले होते. त्यनंतर राऊत यांनी शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेत “१९७५ साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर १९९० मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते.
In 1975 Rajni patel and in the 90s similarly (I guess Murli Doera said) that Shivsena will be wiped off ..Again in 2012 Prithviraj Chavan said the same thing and on both the occasions Shivsena came up even more stronger than earlier !
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) February 7, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.