HW News Marathi
महाराष्ट्र

“मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता, पॉवर”, राऊतांनी मोदींना टोचलं

अहमदनगर | शिवसेना खासदार संजय राूत कायम मोदी सरकारवर, केंद्रावर टीका करताना दिसत असतात. आपली धडाकेबाज शैली आणि निर्भिड वक्तव्यं यामुळे प्रसिद्ध असलेले संजय राऊत आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत त्यांच्या अशाच एका धडाकेबाज वक्तव्यामुळे. सत्ता, पॉवर म्हणजे काय हे त्यांनी त्यांच्या एका भाषणात उदाहरणासहीत स्पष्ट केलं आहे. हे सांगताना त्यांनी हेही सांगितलं की, नरेंद्र मोदी सुद्धा आपण समोरुन जाताना थांबून चौकशी करतात.

मोदी थांबून म्हणतात कैसे हो भाई?

अहमदनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे विधान केलं. “सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देऊ शकतो. गडचिरोलीला पाठवू का? असा दम देऊ शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मी समोरुन जात असताना मोदी थांबून म्हणतात कैसे हो भाई? याला म्हणतात सत्ता, पॉवर. गुजराती देखील सामना पेपर घेतात.

शिवसेनेत माज असायलाच हवा

“शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखं जन्माला आलो, वाघासारखं मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या”, असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

नारायण राणेंची ओळख शिवसैनिकच

राज्यात ओढवलेल्या महापुरानंतर नारायण राणे यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे केले. या दौऱ्यांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राणे यांच्याकडून झालेल्या टीकेवरून आता शिवसेनेचे संजय राऊत यांनी राणेंवर प्रहार केला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी राणेंची ओळख शिवसैनिक असल्याचं सांगत चिमटा काढला आहे. ‘शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला, तरी त्याची ओळख शिवसैनिकच असते. त्यात बदल होत नाही’, असं म्हणत संजय राऊत यांनी राणेंना टोला लगावला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्येः खा. अशोक चव्हाण

News Desk

शिवसेला मोठा धक्का, २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे

swarit

आरक्षणावर विलासराव म्हणाले होते की…, रितेश देशमुखने वडिलांचा ‘तो’ व्हिडीओ केला पोस्ट

News Desk