HW News Marathi
महाराष्ट्र

तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचं स्वागतच करावं लागेल !

मुंबई | प्रकाश आंबेडकरांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला भाजप नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला. हे त्रांगडे कधी सुटेल असे वाटत नाही. आंबेडकरांनी पंढरपुरात गर्दी जमवली व ती गर्दी मंदिरासमोरचे बॅरिकेडस् तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी पोलिसांनी कोणताही बलप्रयोग केला नाही. पोलिसांनी संयम राखला हे महत्त्वाचे. पोलिसांनी लाठी जरी उगारली तरी वातावरण बिघडवायचेच हा डाव त्यामुळे उधळला गेला असा गंभीर आरोप सामना अग्रलेखातून शिवसेनेने प्रकाश आंबडेकर यांच्या पंढरपूर येथील आंदोलनावर केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात नामदेव पायरीचंही दर्शन घेतलं. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलींचे दर्शन घेऊन केला. कपाळाला बुक्का, चंदन लावून आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावलं हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचं स्वागतच करावं लागेल.”

कोरोनाच्या संकटात निदान मंदिर-मशिदीचे राजकारण करू नये, पण विरोधकांना येनकेनप्रकारेण फक्त गोंधळाचे वातावरण निर्माण करायचे आहे. पंढरपुरात मराठी जनतेची विठाई माऊली आहे. पंढरीनाथाखेरीज मराठी माणसांना इतर देवतांना भजण्याचे कारण नाही असे आचार्य अत्रे म्हणत ते खरेच आहे.मंदिरे उघडा ही जनतेची मागणी आहे, असे आता आंबेडकर सांगत आहेत. जनतेची मागणी आहे हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे; पण राज्यातील आरोग्यविषयक आणि बाकीच्या संकटांचे भानही जनतेला आहे.

वारकरी संप्रदायाने याचे भान राखले हे महत्त्वाचे.आंबेडकर यांचे म्हणणे असे की, राज्यकर्ते ऐकत नसतील तर लोकांनी आंदोलन करावे. हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनेच बहाल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या चतुरपणाविषयी कुणाला शंका असण्याचे कारण नाही, पण मंदिरे उघडणार नाहीत किंवा मंदिरात कोणाला प्रवेश दिला जाणार नाही असे कधीच कोणी जाहीर केलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी सादर केलेली वानखेडेंची कागदपत्रे खोटी निघाल्यास मंत्रिपद सोडेन; नवाब मलिकांची रोखठोक भूमिका!

News Desk

#Coronavirus :आठवडाभरात १५०० बेड असलेले ‘विलगीकरण कक्ष’ कार्यान्वित होणार !

swarit

“महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतोय” ,जयंत पाटील

News Desk