HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार- संजय राऊत

मुंबई। माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर मागील काही महिन्यापासून विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली नाही . तेव्हापासून तो विषय आजतागायत रखडला आहे. या मुद्यावरून राजकीय वर्तुळात सतत चर्चा, आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचाच अध्यक्ष होणार असं काँग्रेसने म्हटलं आहे . तर याच विषयावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. ही जागा काँग्रेसचीच होती , त्यांचाच अध्यक्ष होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्रावर उपकार होतील . ही जागा काँग्रेसचीच होती , त्यांचाच अध्यक्ष होणार , असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे . तसेच , त्यांचा कोण उमेदवार असेल हे सोनिया गांधी ठरवतील , असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे . संजय राऊत बोलताना म्हणाले की , महाविकास आघाडीत सुसंवाद आहे . सत्तेतील व्यक्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत . विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे . त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल . महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल . विरोधकांनी ही निवडणूक नाही लढविली तर महाराष्ट्रावर उपकार होतील , असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे सोनिया गांधीशी चांगले संबंध

विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हा काँग्रेसचा प्रश्न आहे . यावर मुख्यमंत्री , राष्ट्रवादी आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली असेल , असं संजय राऊत म्हणाले . पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची शिवसेनेची मागणी असल्यावर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार शिवसेना ठरवत नाही , शिवसेनेचा असेल तर उद्धव ठाकरे ठरवतील . सोनिया गांधींशी ठाकरेंचे चांगले संबंध आहेत . कोणता प्रसंग उभा ठाकल्यास ते एकमेकांशी चर्चा करतात , असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्लॅकमेल करणारे आरटीआय पाठवणे देशभरातल्या अनेकांचा उद्योगच आहे |

swarit

#CoronaViru : एमसीएची सीईटी परीक्षा ३० एप्रिलला होणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

swarit

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, कॉंग्रेसचा उपरोधिक टोला   

News Desk