मुंबई | कालपासून (१० डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचं नाव पुढे असल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. दरम्यान शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास काय भूमिका असेल यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
“शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“नव्या राजकीय वातावरणात विरोधकांना एकत्र येऊन काही निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण लोकसभेत विरोधी पक्षाचं पद ते मिळवू शकले नाहीत हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एकत्र येऊन युपीएला मजबूत करावं लागेल. ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
We'll be happy if Pawar sir becomes UPA chairman. But I've heard that he's personally refused it. We will support him if such a proposal comes to the fore officially. Congress is weak now so the opposition needs to come together & strengthen the UPA: Sanjay Raut, Shiv Sena leader pic.twitter.com/3NNHEjCmPu
— ANI (@ANI) December 11, 2020
तर, पुण्यात रानगवा शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. पुण्यात रेसक्यू ऑपरेशन करत अखेर रानगव्याला पकडण्यात यश आले. मात्र, त्या रानगव्याचा मृत्यू झाला. यावरुन पुणेकरांवर टीका केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनात टीका करण्यात आली आहे.संजय राऊत यांनी माध्यमांशी आज संवाद साधताना असे म्हटले आहे की, “माणूस हा जंगली जनावरांपेक्षा हिंसक झाला आहे. एका बाजूला आपण पर्यावरणाचे रक्षण करतो वाघ बचाओ, सिंह बचाओ पण यात रानगवा सारखे प्राणी येत नाहीत. एख गवा चुकुन पुण्यात आला त्याच्या मागे ज्या पद्धतीने लोकं धावले ते संतापजनक आहे. अखेर त्या गव्याचा मृत्यू झाला. कितीतरी जंगल खात्यातील लोकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. फक्त वाघाला सापळा लावून पकडणं हे काम नाही आहे. आपण जंगलावर अतिक्रमण केल्याने ते आपल्याकडे येत आहेत. आपण जंगलात फार्म हाऊस बांधला, आपण त्यांचं पाणी संपवत आहोत, चारा संपवत आहोत आणि त्यामूळेच प्राणी मनुष्यवस्तीत येत आहेत”.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.