HW News Marathi
महाराष्ट्र

वर्षा राऊत आज ई़डी कार्यालयात चौकशीला जाणार नाही, तर ईडीकडे काही दिवसांचा मागितला वेळ – संजय राऊत

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांना आज (२९ डिसेंबर) ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण त्या आज चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे समोर आले आहे. यासाठी ५ जानेवारीपर्यंतची वेळ वाढवून मागण्यात आली आहे. याबद्दल संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. काही दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. आज त्यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्या आज तरी चौकशीला जाणार नसल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, काल (२८ डिसेंबर) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ईडी आणि भाजपला धारेवर धरलं होतं. आता तुम्हाला घाबरुन जाण्याची गरज आहे. तसेच, त्यांनी काल वर्षा राऊत चौकशीला जाणार की नाही याचा विचार करुन कळवू असे म्हटले होते. त्याप्रमाणे आज वर्षा राऊत जाणार नाहीत. त्यामुळे आता ईडीकडून पुन्हा काय प्रत्यूत्तर येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा

Aprna

शरद पवार आणि अजित पवारांची अचानक भेट, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

News Desk

“मग हे झारीतले शुक्राचार्य कोण जे महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळतायत?”,राऊतांचा सवाल

News Desk