मुंबई | देशात निवडणूकींना सुरुवात झाली आहे. आसाम, प.बंगाल, तामिळनाडू येथील निवडणूका होतात न होतात तितक्यात महाराष्ट्रातही निवडणूकींचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीची एकीकडे जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे बेळगांव लोकसभा पोटनिवडणूकही येऊ घातली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत बेळगावला जाणार आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. संजय राऊत १४ एप्रिलला सकाळी बेळगावात दाखल होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रीज जवळ असलेल्या मराठा मंदिर हॉलमध्ये राऊत जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत.
“बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समीतीचे उमेदवार शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेनेचा त्यांना पाठिंबा आहे. मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी १४तारखेला बेळगावला पोहोचत आहे.” असं लिहित संजय राऊत यांनी उमेदवाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.