HW News Marathi
देश / विदेश

संजय राऊत आज दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना भेटणार

मुंबई | केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात देखील त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी एक आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान, आज (२ फेब्रुवारी) शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंघु सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी बांधवांना दुपारी १ वाजता भेटणार आहेत.

संजय राऊत यांनी पोस्ट करत याची माहिती दिली आहे.’महाविकास आघाडीने शेतकऱी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहीले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्ष प्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज सिंघु सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे’, अशी पोस्ट राऊत यांनी केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनोद दुआंचा विजय ! देशद्रोहप्रकरणी पत्रकारांची ढाल असलेला १९६२ चा निर्णय आहे तरी काय ?

News Desk

ओबीसी आरक्षणासाठी येत्या २६ जूनला राज्यात चक्काजाम आंदोलन ! पंकजा मुंडे आक्रमक

News Desk

INHS अश्विनी इथे बॉम्बे मेडिकल काँग्रेसची 76वी वार्षिक परिषद संपन्न

News Desk