HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा तो शपथविधी ही चूकचं! हे सांगणारा मी पहिला होतो – संजय राऊत

पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (५ जून) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही चुकचं होती असं म्हटलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (४ जून) लोकसत्ताला दिलेल्या एका मुलाखतीत अजित पवारांसोबत घेतलेली शपथ आणि स्थापन केलेलं सरकार ही एक चुक होती असं म्हटलं होत. यावर संजय राऊत म्हणाले की, “जेव्हा ते शपथ घेत होते तेव्हाही मी सांगितलं होतं. हे सांगणारा मी पहिला माणूस होतो. सकाळी ७ ला त्यांनी शपथ घेतली आणि १० ला मी सांगितलं होतं की, हे असं काही नाही आहे ते फार मोठी चुक करत आहेत. संध्याकाळपर्यंत अजित पवार आणि त्यांनी सगळी लोकं त्यांच्या छावणीत परत येतील”.

यावर पत्रकारांनी पुढे असं विचारले की फडणवीस असं म्हणाले की शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला म्हणून हे पाऊल उचलावं लागलं. यावर संजय राऊत म्हणाले की, “जे शिवसेनेला ओळखतात, शिवसेनेचं चारित्र्यं जे चारित्र्य आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना घ़डवली त्यात पाठीत खंजीर खुपसण्याला स्थान नाही. आम्ही समोरुन वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव सांगतो. तसेच, आम्ही छातीवर वार करतो आणि छातीवर वार झेलतो. परिणामांची पर्वा करत नाही. पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काहीही घडलं नाही. तीन पक्ष ठरवून एकत्र आले आहेत. चोरुन एकत्र आले नाहीत. त्यामुळे खंजीर खुपसणं हे शब्द प्रयोग महाराष्ट्रात बुळबुळीत झाले आहेत”.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

तो निर्णय चूकीचा होता!

भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून फाटल्यानंतर पडद्यामागून अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण पाठिंब्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हे सरकार ४ दिवसांत गडगडलं. पण तो निर्णय चुकीचाच होता, असं फडणवीस म्हणाले आहेत. “राष्ट्रवादीसोबतचं सरकार करायला नको होतं. ती चूक आहे. असं सरकार आम्ही स्थापन करायला नको होतं”, असं फडणवीस म्हणाले. निवडणूक काळातील आघाडीविषयी फडणवीसांनी यावेळी सविस्तर भूमिका मांडली आहे.

ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा..

दरम्यान, अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मान्य केलं. “तो निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केलं. पण ही चूक होती. आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेला. ते नसतं केलं तर चांगलं झालं असतं”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांच्या कथित वसुलीप्रकरणात राज्य सरकारचं सहकार्य नाही, CBIचा हायकोर्टात दावा

News Desk

Maharashtra Budget 2021-22 : विकेल ते पिकेल योजनेसाठी २१०० कोटी – अजित पवार

News Desk

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर

News Desk