HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या ‘सामना’तील मुलाखतीचा मुहूर्त लवकरच कळेल!

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात टीका टीपण्णी होत असतेच. तसेच, सामनाचे कार्यकारण संपादक असल्याने संजय राऊत काही नेत्यांच्या मुलाखती घेत असतात. अशात आज (१ जून) पत्रकारांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत कधी घेणार असे विचारले असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सामना दैनिकासाठी कधी मुलाखत देतील, हे लवकरच कळेल, असे वक्तव्य शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केले. सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. या भेटीनंतर संजय राऊत यांनी ही भेट ‘सामना’तील मुलाखतीसंदर्भात असल्याचे सांगितले होते.

मात्र, या भेटीला सहा महिने उलटून गेल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी ‘सामना’ला मुलाखत दिलेली नाही. ही मुलाखत कधी होणार, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊत यांनी फडणवीसांच्या सामनातील मुलाखतीची मुहूर्त लवकरच सुटेल, असे वक्तव्य केले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस ‘सामना’लाही मुलाखत देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

26 सप्टेंबर 2020 रोजी शिवसेना खासदार संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली होती. त्यामुळे त्यावेळी या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता. त्यानंतर मात्र, राऊत यांनी आपण हॉटेलमध्ये होतो, पण फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असतील तर त्याची मला माहिती नाही, असं राऊत यांनी सांगितले होते. मात्र, त्याचवेळी दैनिक ‘सामना’मध्ये लवकरच फडणवीस यांची मुलाखत छापून येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते.

…तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही – संजय राऊत

संजय राऊत यांना सिल्व्हर ओक येथे झालेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी विचारण्यात आले. तेव्हा संजय राऊत यांनी या भेटीमुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याचा दावा फेटाळून लावला. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. शरद पवार यांची तब्येत सध्या थोडीशी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल, असे राऊत यांनी म्हटले.

या भेटीत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा कानमंत्र सांगितला असेल का, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटले की, होय, शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाचप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल. शरद पवार यांनीही विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून फडणवीसांना मार्गदर्शनच मिळाले असावे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यांच्या माध्यमातून विकास वेगाने पूर्णत्वाला | एकनाथ शिंदे

News Desk

आंध्रा प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा जाहीर निषेध  

News Desk

गांधी हत्येनंतर मिठाई वाटणारे गांधी विचार पोहचवणार, सचिन सावंत यांची भाजपवर टीका!

News Desk