HW News Marathi
महाराष्ट्र

मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे अ‍ॅक्शनवाला माणूस !

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावात चांगलीच अडचणीत सापडली आहे. मुंबई आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकास्त्र सुरु झाले आहे.मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. “ही मुंबई १०६ हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ हल्ल्यातील कसाबला याच पोलिसांनी पकडले, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी” अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

“मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी” अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला. मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणारे जे कोणी आहेत, त्यांना मुंबईत मतं मागताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला POK ने मतं दिली का?” असा सवाल संजय राऊत यांनी भाजप आमदार राम कदम यांना विचारला.

“राम कदमांनी कंगना राणावतची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे, झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकणाऱ्या कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय” असेही संजय राऊत म्हणाले. धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीनंतरही राज्यातील भारनियमन बंद राहणार

Gauri Tilekar

देश पुन्हा एकजुटीने उभा करण्याचे काम करावे लागेल!: बाळासाहेब थोरात

News Desk

अजित पवार कुटुंबासह आज काटेवाडीत, श्रीनिवास पवारांना भेटणार

News Desk