HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रावर हल्ले होत असताना इतर मराठी नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा, राऊतांना राज ठाकरेंवर निशाणा

नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (१४ सप्टेंबर) सुरू झाले आहे. अशातच शिवसेनेने चीन मुद्दयावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाराष्ट्रावर हल्ले होत असताना इतर मराठी नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा असा चिमटाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना काढला आहे.

चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्य़ाचा प्रयत्न केला का, याबाबतचं निवेदन केंद्रानं सभागृहात करावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अधिवेशनाबाबत माहिती देत यंदाच्या वर्षी भरगच्च सभागृह नसेल पण कामकाज होईलच अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी चीन मुद्द्यावरुन त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत.

‘केंद्रात कोणतं सरकार आहे याच्याशी सैन्याच्या मनोधैर्याचा संबंध नाही. सरकार कोणाचंही असलं तरी सैन्य लढतंच. सैन्याच्या पाठीशी सारा देश उभा राहीला आहे’, असं राऊत म्हणाले. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला माध्यमांशी संवाद साधला होता. आणि त्यांनी देश सैन्याच्या पाठीशी आहे असे म्हटले होते.

दरम्यान, संजय राऊतांनी यावेळी राज ठाकरे यांनाही नाव न घेता सल्ला देत टोला लगावला आहे. ‘नवी पिढी मराठीपण विसरली आहे. इतर नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा. आमच्या आवाहनाला टाईमपास समजू नये, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला कमी लेखावं हे चालणार नाही. दिल्लीतील नेत्यांनीही भूमिका’ घ्यावी असं ते म्हणाले. महाराष्ट्राचा अपमान होत असताना गप्प बसत असले तर ते मराठी आहेत का ? असा सवाल करत, शिवसेना ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाची गंगोत्री आहे असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं.

अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईत आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ज्याविषयी सतत कंगनाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेतर्फे राऊतांनी पुन्हा एकदा याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘राज्यपालांकडे लोक येत जात असतात. पण, मला माहित नाही कोण भेटलं. या साऱ्याची नोंद ठेवणारी यंत्रणा भाजपकडे आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान, अधिवेशनाच्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवलेला दिसला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑपरेशन लोटस | भाजपकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर

News Desk

गानसम्राज्ञी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल, तपासणीनंतर घरी

News Desk

पाकड्यांनो, आधी कोरोनाची चिंता करा हो, सामनातून टीका

swarit