HW News Marathi
महाराष्ट्र

संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणेंना अटक होणार? आज सुनावणी

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाची  सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात आज (२८ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना या प्रकरणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर राणेंनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणाची आज दुपारी सुनावणी आहे. 

संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे मुख्य आरोपी म्हणून नितेश राणे यांचा हात आहे. त्यामुळे राणेंच्या अटकेसाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही  उमटले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे, असा संघर्ष पेटला आहे. तर नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी कणकवली पोलिसांनी वेग घेतला असता, त्या आधीच नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, न्यायालयात दोन्ही बाजूंकडून वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. वकील संग्राम देसाई हे नितेश राणेंची बाजू मांडलतील. त्याचबरोबर राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत, अविनाश परब, प्रणिता कोटकर, प्राजक्ता शिंदे या कायदेतज्ज्ञांची टीम त्यांच्या सहकार्यासाठी असणार आहे. तर प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करतील. तर दुसरीकडे नारायण राणे आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीत आल्याने चर्चांना अजून उधाण आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर – सांगलीवर पुन्हा एकदा महापुराचे संकट घोंघावत आहे…!

swarit

“याला कोण जबाबदार आहे? केंद्राने विचार करावा” जनआशीर्वाद यात्रेच्या गर्दीवरुन अजित पवार संतापले!

News Desk

यवतमाळमधील ‘त्या’ कोरोना संशयितांची आज होणार कोरोनाची तपासणी

swarit