HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेच्या परळीतील कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके, मेटे म्हणाले सामाजिक मंत्र्याचं भान…

परळी। राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यातर्फे परळीत दिवाळीनिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीने ठुमके लावले होते. या कार्यक्रमात तुफान गर्दी झाली होती याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर सामाजिक खात्याचं सामाजिक भान राखायला हवं. सामाजिक मंत्र्याचे भान हरवले आहे. अशी टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेवर टीका केली आहे.

काळी दिवाळी साजरी होत असताना हे इथे सपना चौधरीला ठुमके लगावताना पाहतात

विनायक मेटे म्हणाले, परळीमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरीचा डान्सचा कार्यक्रम ठेवला. कालच अहमदनगरमध्ये सरकारी रुग्णालयात अकरा जणांचा दुर्दैवाने आक्रोश करत होरपळून मृत्यू झाला. या घटनेचं सावट असताना, शेतकऱ्यांना आजही पैसे मिळाले नाहीत. त्यांची उपाशीपोटी काळी दिवाळी साजरी होत असताना हे इथे सपना चौधरीला ठुमके लगावताना पाहतात.

धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना त्यांना सामाजिक भान होतं

एसटी कामगार घर-दार सोडून आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत, आक्रोश करत आहेत. त्यामध्ये लक्ष घालायचं सोडून हे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला सांगतात. सामाजिक खात्याचं सामाजिक भान सामाजिक मंत्र्यांनी राखायला हवं. बीड जिल्ह्यात खूप मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. त्याचा कधीतरी आढावा पालकमंत्र्यांनी घ्यावा. कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, अवैध धंदे, जमिनी हडपण्याचे प्रकार यामध्ये लक्ष घातलं तर बरं होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजही अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना त्यांना सामाजिक भान होतं. मात्र आता त्यांचे सामाजिक भान हरवले आहे. असे मेटे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील निर्बंधांबाबत अमृता फडणवीस संतापल्या….!

News Desk

मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला लाज वाटायला हवी, कंगनाचे उद्धव ठाकरेंवर शरसंधान

News Desk

धारावीत सिलिंडर स्फोट, 5 जणांची प्रकृती गंभीर, तर 14 जण होरपळले!

News Desk