HW News Marathi
महाराष्ट्र

वकील गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ‘या’ कारणामुळे घेतले ताब्यात

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी सदावर्तेंना गिरगाव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण सुरु असतानाच सदावर्तेंना सातारा पोलिसांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सातारामध्ये सदावर्तेंवर दीड वर्षापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणी त्यांना मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातून आज (१४ एप्रिल) ताब्यात घेतले आहे. यानंतर पोलीस साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दरम्यान, एका टिव्ही न्यूज चॅनला दिलेल्या मुलाखतीत सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. सदावर्तेंच्या वक्तव्यावर राज्यभरात विरोध दर्शविला होता. या वक्तव्यविरोधात साताऱ्यात राजेंद्र निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे. या प्रकरणी सदावर्तेंविरोधात २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. 

या वादग्रस्त प्रकरणी सदावर्तेंना वारंवार चौकशीसाठी बोलवून देखील ते हजर न राहिले नाही. परंतु, शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी गिरगाव न्यायालयात सुनावणी पार पडली. सदावर्तेंना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी सातारा पोलिसांकडून सदावर्तेंचा ताब्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने सतावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे ताबा देण्यास हरकत नाही, असे म्हटले आहे. सदावर्तेंना आर्थर रोड जेलमध्ये नेण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्या आहेत. यानुसार आज तुरुंगातून ताब्यात घेतले

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार!

News Desk

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले!

News Desk

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध – छगन भुजबळ

News Desk