HW News Marathi
Covid-19

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

मुंबई | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लोकांना अनोखा संदेश दिला आहे. ‘मी मास्क वापरतो तुम्ही मास्क वापरा’ असे आवाहन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या कोरोना काळातील वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे.

५० लाख लोकांपर्यंत हा मेसेज पाठवत त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी नवे विधायक पाऊल उचलले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला राज्यभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्हिडीओतून तसेच सोशल मीडियाद्वारे मास्कसह त्यांना शुभेच्छा देत प्रतिसाद दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवसाला सामाजिक जाणीवेची सतेज पाटील यांनी जोड दिली आहे. लोकांच्या सुरक्षीततेचा विचार करून मंत्री पाटील यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत. त्याऐवजी “मी मास्क वापरतोय, तुम्हीही वापरा” याच माझ्यासाठी शुभेच्छा, असे आवाहन केले. या आवाहनाला राज्यातील विविध पक्षातील मातब्बर नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपलं गाव ‘कोरोनामुक्त गाव’ करा, मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

News Desk

पाथरूडमधील भाऊराव काटे शाळेतील ६ विद्यार्थींना कोरोनाची लागण

Aprna

‘मन की बात’ आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, मनसेचा टोला

News Desk