HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये

मुंबई | कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व स्तरांतून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकर, राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईत लढत आहेत. तसेच, लोकांकडूनही मदतीचे आवाहन केंद्र सरकारकडून केले जात असतानाच, पी.एम केअर फंडात पैसे जमा करण्याच्या मोहिमेत काही जमा होणाऱ्या निधीत काही अडचणी आल्या. या अडचणी पैशांच्या नव्हत्या तर काही जणांनी या फंडाचा गैरवापर करत बनावट वेबसाईट, युपीआय आयडी बनवले होते. दरम्यान, सायबर पोलिसांकडून लोकांना सतर्कही करण्यात आले होते. महाराष्ट्रातील काही मोठ्या भाजप नेत्यांकडूनही लोकांना हे चुकीचे आवाहन केले गेल्याचेही समोर आले.

याबाबत, राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटरवरुन या सगळ्या प्रकाराला सवाल केला आहे. मदतीत पण फ्रॉड? पक्षाच्या माजी नेत्यांनाच पीएम केअर फंड कोणता आहे याची माहिती नाही असा प्रश्न उपस्थित केला गेला. दरम्यान, भाजप नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये असे सांगत शेअर केलेली लिंक ही फेक असल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडमध्ये भाजपला मोठं खिंडार! प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा, लवकरच काँग्रेस प्रवेशाची शक्यता

News Desk

‘मंदा म्हात्रेंच्या विधानावर आता चंद्रकांत पाटलांचं उत्तर! म्हणाले….’

News Desk

हुबळी रेल्वे स्थानकाच्या स्फोट, १ जण गंभीर जखमी

News Desk