HW News Marathi
क्राइम

तक्रार दिल्यानंतर परत शहरात फिरण्याची काय आवश्यकता? याचा अर्थ तुम्ही पब्लिसिटी स्टंट करत आहात- सतेज पाटील

सिंधुदुर्ग | सतेज पाटील आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं. मला वाटते किरीट सोमय्या हे सरकार अस्थिर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत. एकदा तक्रार दिल्यानंतर परत तुम्ही शहरात फिरण्याची काय आवश्यकता आहे? याचा अर्थ तुम्ही तिथे पब्लिसिटी स्टंट करत आहात. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांची बदनामी करायची एवढंच काम सुरू आहे. सत्य थोड्या उशीराने बाहेर पडतं. परंतु तोपर्यंत कारण नसताना लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतो. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठीचच हे षडयंत्रं असल्याचा दावा पाटील यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी कुठेतरी उघडपणे सांगितले पाहिजे हे सगळ आम्ही किरीट सोमय्या यांना करायला लावतोय.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी कुठेतरी उघडपणे सांगितले पाहिजे हे सगळ आम्ही किरीट सोमय्या यांना करायला लावतोय

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील मंत्र्यांना टार्गेट केलं आहे. त्यावरून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. किरीट सोमय्या यांना आम्हीच सगळं करायला सांगतो हे एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे तरी सांगावं, असं आव्हानच सतेज पाटील यांनी दिलं आहे.तसेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी कुठेतरी उघडपणे सांगितले पाहिजे हे सगळ आम्ही किरीट सोमय्या यांना करायला लावतोय. एकदा त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रालाही कळेल की राज्यात सुडबुद्धीचं राजकारण होतंय, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरही भाष्य केलं. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मागच्या वेळी 144 कलम लावलं होतं. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये अशी अपेक्षा होती. तुम्ही तिथे शांततेत जावं. भडकवणारी किंवा चिथावणीखोर विधाने करू नये. जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काही करू नये अशी आमची आता सुद्धा अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केतकी चितळेला ‘या’ प्रकरणी मिळाला जामीन

Aprna

अभिनेत्री माही गिल मारहाण प्रकरणी पोलिसांकडून ७ जण अटकेत

News Desk

किन्हीराजा मध्ये जऊळका रेल्वे पोलिसांचे “पथसंचलन”

News Desk