HW News Marathi
क्राइम

किन्हीराजा मध्ये जऊळका रेल्वे पोलिसांचे “पथसंचलन”

महादेव हरणे
मालेगांव किन्हीराजा गावामध्ये पोलिसांच्या वतीने पथ संचलन करण्यात आले. गणेशोत्सव आणि ईद निमित्त किन्हीराजा मध्ये तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती जऊळका रेल्वेचे ठाणेदार आर.जी.शेख यांनी आज दिली. सद्या जिल्ह्यात गणोशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे .कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडणार नाही त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दि 2 सप्टेंबर शनिवार रोजी बकरी ईद असल्याने पोलिसांनी जातीय सलोखा राखत सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्याचा संदेश पथसंचालणातून ठाणेदार आर. जी. शेख यांनी केले आहे .आज संध्या. 6 वाजता पोलीस विभागाच्या वतीने किन्हीराजा गावामध्ये गणपती विसर्जन मार्गावर पोलिस चौकी पासुन सुरूवात करून शिवचौक केशवराय मंदिर बंजारा वस्ती मज्जीद परिसर मेडीकल चौक मार्गाने पुन्हा शिवचौक पोलिस चौकी व बसस्टॉप पर्यंत पथसंचालन करण्यात आले . यावेळी जऊळका ठाणेदार आर जी शेख सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश बनसोड खुपीया विभागाचे मेजर घुले किन्हीराजा पोलिस चौकीचे जमादार गणेश बियाणी संतोष कोहर न्यानेश्वर राठोड होमगार्ड सह पुर्ण जऊळका पोलिस स्टेशनचा स्टाफचा किन्हीराजा पथसंचलना मध्ये मोठ्या प्रमाणत सहभाग आढळुन आला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंबरनाथमध्ये तरुणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

News Desk

कोल्हापूरात महिलेची ठेचून हत्या

News Desk

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

News Desk