HW News Marathi
महाराष्ट्र

“कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?”, सतेज पाटलांचा सवाल

कोल्हापूर | राज्यात निर्बंध जरी शिथिल केले असले तरी देखील तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठं विधान केलं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सतेज पाटील यांनी आज स्पष्ट केलं. या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

लसीकरण मिळावं यासाठी शंखनाद आंदोलन करावं

सतेज पाटील यांनी भाजपच्या आंदोलनावरही टीका केली आहे. भाजपने 100 टक्के लसीकरण मिळावं यासाठी शंखनाद आंदोलन करावं. आंदोलनापेक्षा केंद्राकडून जास्तीत जास्त लसीकरण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला त्यांनी लगावला. मुरलीधर जाधव यांनी संयम बाळगावा त्यांचा योग्य सन्मान होईल. आपल्याच जिल्ह्यातील संस्थेला बदनाम करू नका. 33 वर्षानंतर सभासदांच्या मालकीचा गोकुळ झाला आहे. मी स्वतः आपल्याला भेटून मार्ग काढेन, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं आहे.

महाविकास आघाडीपासून लांब जातील असं सध्या तरी वाटत नाही

यावेळी त्यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. एसडीआरच्या नियमानुसार मदत दिली जात आहे. ज्यादा मदतीबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. त्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये. लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत आहेत. लवकर मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. ते महाविकास आघाडीपासून लांब जातील असं सध्या तरी वाटत नाही. मी स्वतः फोन करून जलसमाधी आंदोलन टाळण्या बाबत आवाहन करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा घट, सक्रिया रुग्णसंख्याही खाली!

News Desk

‘आष्टी’च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

‘तिरंदाजीत भारताला पहिलं पदक!’

News Desk