HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न – सतेज पाटील

कोल्हापुर | राज्यभरात दूध उत्पादकांचे आक्रमक आंदोलन सुरु आहे. तर, या आंदोलनात दूध उत्पादकांचा भाववाढीच्या मागणी पेक्षा राजकीय घडामोडी जास्त सुरू आहेत. आज (१ ऑगस्ट) कोल्हापूरमध्ये माजी खासदार व भाजपा नेते धनंजय महाडीक, समरजीत घाटगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून दूध आंदोलन केले.

यावरून आता, गृहराज्य मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एकाचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला आहे. “भाजपचं कोल्हापुरातील दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न आहे”, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला.

तर चंद्रकांत पाटलांना त्यांनी, “चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी ते कोल्हापुरात येतात. हिंमत असेल तर त्यांनी केंद्राविरोधात आंदोलन करावं. ते केंद्र सरकारविरोधात आंदोलन का करत नाहीत”, असा सवाल सतेज पाटील विचारला आहे.

“काही तरी अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन आहे. लोकांच्या हितासाठी हे आंदोलन नाही. तुम्ही काय काम केलं हे जनतेला माहित आहे. दूध उत्पादकांची कणव भाजपला नाही. केंद्राची जबाबदारी महत्वाची आहे” असेही सतेज पाटील यावेळी म्हणाले.

“आंदोलनाला प्रतिसाद नाही. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. स्वाभिमानीसोबत बोलणं झालं. लवकरच सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. राजू शेट्टींवर आंदोलनाची वेळ येणार नाही”, असा विश्वास यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

मोहन भागवतांचा राज ठाकरेंनी घेतला समाचार | “थंडीतलं एक उबदार स्वप्न!”

News Desk

राजेश कुंटेंच्या याचिकेवर 10 ऑगस्टला होणार सुनावणी

News Desk

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा

News Desk